Tuesday , March 28 2023
Breaking News

पनवेल ज्येष्ठ नागरिक संघात आरोग्य केंद्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सभासदांसाठी तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून यापूर्वी उटणे प्रकल्प़, तिळगूळ विक्री यातून मिळालेल्या उत्पन्नातून व संघास मिळालेल्या देणग्यांतून खर्च वजा जाता शिल्लक रकमेतून अपंगाना मदत़, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 10 वी 12 वीतील मुलांना शिष्यवृत्ती, त्याजबरोबर सेवाव्रती संस्था व आश्रमांना आर्थिक सहाय्य करीत आहे. तसेच सभासदांना सवलतीत 500 ग्रॅम च्यवनप्राश दिले जाते. सभासदांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र आता चालू झाले आहे. 

शुध्द आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य सुभाष जैऩ, संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी़, आरोग्य समिती प्रमुख विनायक वत्सराज़, सचिव जयवंत गुर्जर व अन्य सहकारी यांनी चर्चा करूऩ आयुर्वेद व्यासपीठ व संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर बुधवारी 4.00 ते 5.00 या वेळात आरोग्य केंद्र सुरू केले आहे. व्यासपीठाचे 4 ते 5 तज्ज्ञ वैद्य सभासदांचे परिक्षण करून सल्ला देतात. यामध्ये वजऩ, रक्तदाब तपासणी़, नाडी परिक्षा व लक्षणानुसार आयुर्वेदिक औषधे, आहार विहार, पथ्य पाणी याची माहिती देतात. औषधे रूग्ण सभासदाने विकत घ्यावयाची आहेत. व्यासपीठातर्फे आलेल्या वैद्यांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी वैद्य समिक्षा नवरीकर प्रत्येक वेळी हजर असतात. रूग्ण तपासणी मोफत असून संघातर्फे व्यासपीठाला नाममात्र शुल्क दिले जाते. सभासद यांचा पुरेपूर फायदा घेत आहेत. केवळ आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करण्यासठी सुरू केले आहे. संघातर्फे सुनील खेडेकर व सुधा वत्सराज येणार्‍या वैद्याना सहाय्य करतात. ज्येष्ठ नागरिक संघाकडून ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. वाढत्या वयात ज्येष्ठांना विविध आजारांशी सामना करावा लागतो, या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply