Breaking News

जोकोविचचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था

सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या फिलीप कोलश्रायबरने त्याचा सरळ सेटमध्ये 6-4, 6-4 असा पराभव केला. त्याची गाठ आता गेल मोंफिसशी होईल.

महिला विभागात नाओमी ओसाका आणि सिमोना हालेप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. नाओमीला चौथ्या फेरीत बेलिंडा बेनसिच हिने 3-6, 1-6 असे हरवले. नाओमी हिने गेल्या वर्षी येथे विजेतेपद मिळविले होते. सिमोना हालेप हिला मार्केटा वोनद्रोसोवा हिने पराभूत केले. व्हीनसने उपांत्यपूर्व फेरी गाठताना मोना बार्थेल हिचा 6-4, 6-4 असा पराभव केला.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply