Breaking News

‘त्या’ गाडीचालकाला रुग्णालयातून अटक

पनवेल : बातमीदार

कामोठ्यात बेदरकार गाडी चालवून अपघात करणार्‍या चालकास मंगळवारी (दि. 23) पनवेल शहरातील लाइफलाइन रुग्णालयातून अटक करण्यात आली. हरबिंदर सिंग माटारू (वय 75) असे त्याचे नाव असून, अपघातानंतर तो फरार होऊन रुग्णालयात दाखल झाला होता.कामोठे सेक्टर 6 येथील मुख्य रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला होता. चारचाकी स्कॉडा चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावरून पायी चालणार्‍या आणि दुचाकीवरून जाणार्‍या नागरिकांना उडविले होते. या अपघातात सात वर्षीय मुलगा सार्थक चोपडे आणि वैभव गुरव (32) या तरुणाचा मृत्यू झाला होता; तर साधना चोपडे (30), श्रद्धा जाधव (31), शिफा सारंग (16), आशिष पाटील (22), प्रशांत माने आणि श्रद्धा जगपती हे पाच जण जबर जखमी झाले आहेत.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply