Breaking News

म्हसळा नगरपंचायतीचा अजब कारभार

भारतीय जनता पक्षाने केले सर्वेक्षणाचे आवाहन

म्हसळा : प्रतिनिधी

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात म्हसळा, तळा व माणगाव या तीनही नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तीनही नगरपंचाय तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीची एकहाती सत्ता आहे, मात्र तेथे स्थानिक विकासाचं उद्दिष्ट किती पूर्ण झालं याचा अभ्यास त्या त्या नगरपंचायत हद्दीतील मतदारांनी करावा, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी म्हसळा येथील पत्रकार परिषदेत केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, शहर अध्यक्ष संतोष पानसरे उपस्थित होते.

म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने महाविकास आघाडीची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल चार नगराध्यक्षांची नेमणूक होऊनही त्यांचा किंवा नगरसेवकांचा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अद्यापही अभ्यास झाला नसल्याचे चित्र आहे. म्हणून यावेळी पारदर्शकपणे मतदान होण्यासाठी मतदारांनीच अभ्यास करून आपले उमेदवार ठरविणे हेच योग्य ठरणार आहे, असे कृष्णा कोबनाक यांनी सांगितले.

जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक आक्रमक

भाजप शहरातील जनतेच्या हिताचे विविध 10 प्रश्न देऊन सर्वेक्षण कार्यक्रम कालबद्धरित्या राबवणार आहे. शहरातील वकील, डॉक्टर, व्यवसायिक, सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी, महिला मतदार यांच्याजवळ भाजपा कार्यकर्ते प्रत्यक्ष संर्पक साधून सर्वेक्षण करणार असल्याचे कोबनाक यांनी सांगितले. या प्रश्नांमध्ये शहरात योग्य दाबाने, स्वच्छ, शुद्ध पाणी मिळते का?, अंर्तगत रस्ते सुसज्ज आहेत का?, बाजारपेठेत सातत्याने स्वच्छता केली जाते का ? बाजार पेठेत शौचालय सुविधा आहे का? दिवाबतीची सुविधा सुरळीत देण्यांत येते का? आरोग्यसेवा उत्तमरीत्या राबविली जाते का? प्रभागातील नगरसेवकांचा संर्पक व  समन्वय कसा आहे? अनधिकृत बांधकामाबाबत नगरपंचायत लक्ष देते का? वाहतूक कोंडी, पार्कींग बाबतीत शाश्वत उपाय योजना होत आहे का? ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणत्या सुविधा उभारल्या आहेत? आदी प्रश्नांचा त्यात समावश आहे. यावरून कृष्णा कोबनाक आक्रमक झाले आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply