Breaking News

कार्यकर्ता हाच भाजपचा विश्वास ः डॉ. अरुण चटर्जी भाजप सदस्य नोंदणी आढावा बैठकीला प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी

आपल्या देशात सत्तेसाठी सर्व एकत्र येतात. पराभव झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक तुकडे झाले, पण भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालाणारा पक्ष असल्याने त्याचे पराभव झाल्यानंतर तुकडे झाले नाहीत, असे भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे सहप्रमुख राजस्थानचे माजी मंत्री डॉ. अरूण चटर्जी यांनी पनवेल येथील सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा बैठकीत बोलताना सांगितले.

पनवेल विधानसभा मतदार संघातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, विस्तारक आणि बूथ समिति प्रमुखांची आढावा बैठक पनवेल मार्केट यार्डमधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या हॉलमध्ये शुक्रवारी (दि. 26) सकाळी 11 वाजता झाली. यावेळी भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे राष्ट्रीय सहप्रमुख डॉ. अरूण चटर्जी, महाराष्ट्राचे सहप्रमुख संजय उपाध्याय, प्रदेशचे सुरेश शाह, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे उपस्थित होते. यावेळी डॉ. अरूण चटर्जी यांनी सामान्य कार्यकर्ता हाच भाजपचा विश्वास असल्याचे सांगून कार्यकर्त्यांची विचारधारा देशासाठी काम करण्याची आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपले पुढील लक्ष भाजप देशाच्या ज्या भागात पोहचला नाही, तिथे पोहोचण्याचे ठेवले असल्याचे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना सदस्य नोंदवण्यासाठी रोज चार घरी जाण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी किमान पाच वृक्ष लावण्यास सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबत असलेल्या योजनांचीही माहिती दिली. यावेळी महाराष्ट्राचे या अभियानाचे सहप्रमुख संजय उपाध्याय यांनी सदस्यता नोंदणी अभियानाला सणाचे स्वरूप पक्षाने दिले आहे. तुम्ही जितक्या जास्त घरात जाल, तेवढे जास्त सदस्य होतील. प्रत्येक बुथवर 50 टक्केपेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी करतानाच मतदार संघात 10 हजार नवीन मतदार नोंदणी करण्याचे लक्षही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी सदस्य नोंदणी करताना येणार्‍या  अडचणी कशा सोडवाव्यात, याचेही मार्गदर्शन केले. यावेळी सिडकोचे अध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांनी विस्तारकाची भूमिका घेऊन पक्षाचा विस्तार करावा पण ते काम करताना पक्षाने घालून दिलेली सीमारेषाही पाळणे महत्वाचे आहे. सदस्यता नोंदणी अभियानात काम न केल्याचा पश्चाताप होईल, असा इशारा कार्यकर्त्यांना दिला

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply