Breaking News

अलिबागमधील मुस्लिम बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग : प्रतिनिधी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत  ठाकूर, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील मुस्लिम बांधवानी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यातील इब्राहिम हसन खान यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या अलिबाग शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले. अलिबाग पंचायत समिती सदस्य उदय काठे, भाजप राज्य परिषद सदस्य सतीश लेले, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ विस्तारक राजेंद्र म्हामूनकर, अलिबाग तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, रशीद शेख, अब्दुल सय्यद  आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply