Breaking News

बसस्थानकातील शौचालयाचा मैला रस्त्यावर

प्रवाशांसह रोह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रोहे ः प्रतिनिधी

तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोहा एसटी बसस्थानकातील शौचालयाची टाकी भरून त्यातील मैला बसस्थानकाच्या आवारात व रस्त्यावर आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे व रोह्यातील नागरिकांचेे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहा शहरातील एसटी बसस्थानक खासगीकरणातून बांधले आहे. या स्थानकात मुतारी व शौचालये आहेत. या शौचालयाचा वापर प्रवाशांसह बसस्थानकात असलेल्या व्यापारी संकुलातील व्यापारी  करतात. या शौचालयाची टाकी पूर्णपणे भरली असून त्यातील मैला बाहेर पडत आहे. तो बसस्थानकासह या आगाराला लागून असलेल्या बायपास रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी येथे येत असतात. येथील व्यापारी संकुलात हॉटेल, खाद्यपदार्थ व मिठाईची दुकाने आहेत. या मैल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयाच्या देखभालीचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. या ठेकेदाराने शौचालयाचा मैला गटारात सोडण्यासाठी पंप लावला असल्याचे निदर्शनास येताच नगर परिषदेने तो जप्त केला आहे. दरम्यान, एसटी आगाराचे अधिकारी आणि रोहे नगर परिषदेने संबंधित ठेकेदाराला ताबडतोब परिसर स्वच्छ करण्यास सांगितले असून, शौचालय चालकांनी या ठिकाणी पावडर टाकून परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply