Breaking News

सुगम संगीत स्पर्धेत ‘सीकेटी’च्या सुरांची मोहिनी

पनवेल : रामप्रहर वृत्त

मुंबईतील विक्रोळी येथील विद्या विकास सोसायटी संचलित मटकर संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. संगीतकार सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 29 जुलै या त्यांच्या स्मृतिदिनी ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत विक्रोळी, घाटकोपर, वांद्रे, अंधेरी, नेरूळ अशा विविध भागांतील शाळांनी सहभाग घेतला होता. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत सीकेटीच्या पाच विद्यार्थ्यांनी सुरांची जणू मोहिनीच घातली. स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी या गटात स्वर चेतन म्हात्रे याने प्रथम क्रमांक (दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह), पाचवी ते सातवीच्या गटात वेदिका चेतन म्हात्रे हिने तृतीय क्रमांक (600 रु., प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह), प्रसाद अभिजीत फडके याने उत्तेजनार्थ क्रमांक (प्रमाणपत्र), आठवी ते दहावी गटात मोनालिसा जयदेव सामंता हिने प्रथम क्रमांक (दोन हजार रु., प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह) आणि ऋतुजा गणेश गडगे हिने उत्तेजनार्थ (प्रमाणपत्र) क्रमांक पटकाविला. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची विशेष तयारी संगीत शिक्षिका सुप्रिया ताम्हणकर आणि तबला शिक्षक संतोष खरे यांनी करून घेतला होती. या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले की, या स्पर्धेकरिता दरवर्षी संगीत शिक्षक विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतात. स्पर्धेत सीकेटी विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांना गौरविले जाणे ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी,  मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply