पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं नेरे हायस्कूल व भागशाळा विहीघर या शाळेमध्ये मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 1) झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीनं विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गत नेरे हायस्कूल व भागशाळा विहीघर या शाळेमध्ये मोफत वह्यावाटप करण्यात आल्या. याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य शंकर ठाकूर, एकनाथ पाटील, प्रकाश घाडगे, दर्शन ठाकूर, सुप्रिया मांडवकर, वर्षा पाटील, प्रज्ञा कलोते, सुवर्णा भगत, संजय पाटील, वांगणीतर्फे वाजे विभागप्रमुख सुनील पाटील, शिवसेना शाखाप्रमुख बबन फडके, ग्रामपंचात सदस्य सुधीर फडके, भरत पाटील, हरिश्चंद्र फडके, तंटामुक्ती अध्यक्ष महादू पाटील, लक्ष्मण पाटील, ज्येष्ठ नागरिक बाळाराम पाटील, सदानंद मेस्त्री, अंबो रोडपालीकर, पांचाळ मॅडम, गजानन पाटील, अनंता ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.