Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली. तर पनवेलचे विकासपुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. या निमिताने पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक लाख 83 हजार 931 मते मिळाली त्यांनी 51 हजार 91 मतांची आघाडी मिळवत बाळाराम पाटील आणि इतर विरोधकांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लीना गरड (43989), मनसेचे योगेश चिले (10231), लोकमुद्रा जनहित पार्टीचे कांतीलाल कडू (2429), रिप्लब्लिकन सेनेचे संतोष पवार (1729), बहुजन समाज पार्टीचे गजेंद्र अहिरे (1526), डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नॅशन पार्टीचे वसंत राठोड (1038), भारतीय जन सम्राट पार्टीचे पवन काळे (477), तर नोटाला 3905 मते पडली. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांनाही अपप्रचाराचे रान उठवले होते. मात्र शेवटी पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत कामी आली आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विजयाबद्दल अगोदरच खात्री दिली होती. आमदार प्रशांत ठाकूर सहज निवडून येतील असा त्यांनी जाहीर दावा केला होता. तो शब्द आणि शब्द तंतोतंत या निकालाच्या रूपातून खरा ठरला. या विजयाने मतदार संघातील जनतेने पुन्हा आपले प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच असल्याचे दाखवून दिले. पनवेल विधानसभा मतदार संघ हा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वांत मोठा मतदार संघ आहे. सहा लाख 52 हजार 62 मतदार संख्या असून तीन लाख 82 हजार 335 मतदारांनी मतदान झाले. अपक्षेनुसार सर्वाधिक मते मिळवत आमदार प्रशांत ठाकूर दणदणीत विजय मिळविला. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे त्यांचा विजय नक्की असल्याचा स्पष्ट मत जाणकारांनी व्यक्त केला होता. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पनवेलची जनता हितचिंतक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि हा विजय सहज केला.
या विजयाच्या निमिताने कार्यकर्ते आणि पनवेलच्या तमाम जनतेने जल्लोष करत आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. पनवेलध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि ’एकच वादा प्रशांतदादा’ असा जयघोष सर्वत्र पहायला मिळत होता.
मला चौथ्यांदा निवडून दिल्याबद्दल मी महायुतीतील प्रत्येक कार्यकर्ता व मतदाराचे मनपूर्वक आभार मानतो. पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावण्याची माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मानून यापुढेही कायम काम करत राहीन. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकला त्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो, असे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply