Breaking News

‘…तर मुंबईत लोकलसेवा पूर्ववत होईल’

मुंबई : लोकलसेवा नियमितपणे सुरू होण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेने दिली आहे. लोकल कधी सुरू केली जाणार, या प्रश्नाचे उत्तर आताच मिळाले नसले तरी ते लवकरच मिळू शकते, असे संकेत मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी लोकल सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे. राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्यास आम्ही लोकल सुरू करू, असे गोयल म्हणाले. लोकलसेवा सुरू करायची की नाही याचा निर्णय पूर्णपणे राज्य सरकारवर अवलंबून आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करायला हवी. ती मागणी रेल्वे मंत्रालयाने मान्य केली व तसे आम्हाला कळविल्यास सरकारने सांगताच आम्ही लोकलसेवा सुरू करू, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply