कळंबोली ः रामप्रहर वृत्त
भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा पाटील यांच्या पाठपुराव्याने व पनवेल महानगरपालिकेचे गटनेते परेश ठाकूर यांच्या आदेशानंतर पडघे गावाला अनेक नागरी सुविधांची लॉटरी लागली आहे. यामध्ये गावातील रस्ता, पाण्याची पाईपलाईन, गटार, समाजमंदिर व स्मशानभूमी अशी अनेक कामे करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांकडून कृष्णा पाटील परेश ठाकूर व कृष्णा पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कृष्णा पाटील यांनी गावाला सुविधा मिळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेतील गटनेते परेश ठाकूर यांच्याकडे साकडे घातले होते. त्याप्रमाणे ठाकूर यांनी महापालिकेकडून पडघे गावासाठी 38 लाख रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात केला. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावची जुनीच पाईपलाईन असल्याने तिला गळती लागली आहे. परिणामी गावातील पाण्याची समस्या कायमची निकालात काढताना कृष्णा पाटील यांनी गटनेते परेश ठाकूर यांच्याकडून दोन इंचाच्या जागी तीन इंचाची पाईपलाईन नव्याने मंजूर करून तिचे काम सुरू आहे, तसेच साई मंदिर ते कासाडी नदीपर्यंत गटार मंजूर करण्यात आले आहे. पालिकेच्या माध्यमातून समाजमंदिर बांधण्याचा निर्णय परेश ठाकूर यांनी घेतला आहे, असे कृष्णा पाटील यांनी सांगितले. गावातील सर्व विद्युत खांब बदलताना 125 विद्युत खांब मंजूर झाले आहेत.