Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना; पनवेलमध्ये 1069 लाभार्थी

पनवेल : रामप्रहर वृत्त

शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना लागू असून, पनवेल महापालिका क्षेत्रात आठ हॉस्पिटलची यामध्ये निवड करण्यात आली आहे. 1069 लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत याचा लाभ मिळणार आहे. ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी पनवेल महानगरपालिकेने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे. या योजनेसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांंची कार्यशाळा घेणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली पालिका ठरली आहे. 

 या योजनेंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाख रुपये इतक्या विमा संरक्षण रकमेच्या मर्यादेपर्यंत मोफत उपचार केले जातात, तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियेसाठी अडीच लाखांपर्यंतची मर्यादा आहे, असे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

उपचार मिळणारी रुग्णालये

सिव्हिल हॉस्पिटल (अलिबाग), उपजिल्हा रुग्णालय (माणगाव), टाटा मेमोरियल (खारघर), एमजीएम (कामोठे), एमजीएम (कळंबोली), लाइफ लाइन (पनवेल), उन्नती (पनवेल), बिरमोळे (पनवेल), पटवर्धन (पनवेल)

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply