Breaking News

कोरोनाशी लढा देण्यासाठी जी 20 देशांची एकजूट

मानवी आरोग्य, विकासासाठी कार्यक्रम राबवा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक महामारी घोषित झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी 20 देशांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य देशांतील नेत्यांनी कोविड 19च्या या संकटावर मात करण्यासाठी एकजूट दाखवत मिळून काम करण्याचा संकल्प केला आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तीन मिनिटांच्या भाषणात मानवी आरोग्य आणि विकासाला केंद्र मानून कार्यक्रम तयार करावा, असे मत मांडले.
सौदी अरबचे पंतप्रधान शाह सलमान बिन अब्दुल अजीज-अल-सौद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक कोरोनाच्या महामारीमुळे पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह जी 20 देशांचे प्रतिनिधी आणि काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
पंतप्रधान मोदी यांनी चांगल्या आरोग्य सेवांसाठी जागतिक स्तरावर होणार्‍या संशोधनाला सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार करावी, असा आग्रह धरला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply