महानगरपालिकेच्या शिबिराला प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘एक पाऊल कॅन्सरमुक्तीसाठी’ या उपक्रमांतर्गत गावदेवी पाडा आणि खारघर, कामोठे, कळंबोली येथे गर्भाशय मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 1) करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला रामशेठ ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठेमधील नागरी आरोग्य केंद्रात पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘एक पाऊल कॅन्सरमुक्तीसाठी’ या उपक्रमांतर्गत गर्भाशय मुख व स्तनाच्या कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारीही (दि. 2) तपासणी होईल.
या वेळी आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेविका मुग्धा लोंढे, विद्या गायकवाड, राजेश्री वावेकर, दर्शना भोईर, सुशीला घरत, कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, पुष्पा कुत्तरवडे, अरुणा भगत, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, गीता चौधरी, डॉ. मुजावर यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.