Breaking News

महेश बालदी यांना पसंती; उरण विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील पोतदार सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेते महेश बालदी यांनी स्वागत केले.  उरण विधानसभेसाठी महेश बालदी यांना पहिल्या क्रमांकाची पसंती व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

निवडणूक म्हटली की, आरोप-प्रत्यारोप असतातच. त्यातच विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते कायमच वेगवेगळे फंडे अवलंबत असल्याने अनेक जण प्रभावित होत वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व

स्वीकारत असतात. त्यातच सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला वाढता पाठिंबा मिळत असून उरण मतदारसंघातील तळागाळातून भाजपला नवसंजीवनी प्राप्त होत असल्याने डॅशिंग नेते महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चौक जिल्हा परिषद विभागातील धारणी, कांढरोली, विणेगाव, भिलवले, वावंढळ, चौक, वडविहीर, बोरगाव, चिंचमाळ, बुरुजवाडी, चांभार्ली, नढाल, वासांबे वरोसेवाडी, वडगाव, टेंभरी, पानशिल, रिस, कोपरी, सारंग, आसरोटी आदी 22 पेक्षा अधिक गावांतील असंख्य शिवसेना, शेकाप, मनसे, काँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर

पक्षप्रवेश केला.

आमदार अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप सरचिटणीस महेश बालदी, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, युवा नेते विनोद साबळे, रामदास ठोंबरे, लक्ष्मण पवार, पंकज शहा, ज्ञानेश्वर मुंढे, गणेश कदम, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष मनोज साखरे, महिला नेत्या आदिती शेमडेकर, मनाली मुकादम, आश्विनी माळी, गणेश मुकादम, गणेश कदम, नंदू सोनावणे, ज्ञानेश्वर सुर्वे आदी प्रमुखासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महेश बालदी यांनी शेकाप नेते विवेक पाटिल व शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्यावर निशाणा साधत टीका केली. तर पुढे बोलताना असे म्हणाले की, पुढील पाच वर्षात 5000 कोटीची कामे निश्चित करेल, अशी ग्वाही देतो. तुमच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नाही. या वेळी भाजपत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मान्यवरांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उरण मतदारसंघात ठिकठिकाणी झालेले पक्षप्रवेश पाहता भाजपची ताकद अधिकच वाढू लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply