Breaking News

चतुरस्र नेतृत्व, कुशल संघटक

व्यक्तीच्या जीवनात असा आनंदाचा दिवस येतो की त्या वेळी खर्‍या अर्थाने तिच्या जीवनातील गुणांचे मूल्यमापन होते. अतिशय कमी राजकीय कारकिर्दीत रायगड जिल्ह्यातील राजकारणावर ज्यांनी प्रभाव निर्माण केला आहे ते नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांतजी ठाकूर.

लोकनेते व सर्वार्थाने विकासाची दृष्टी असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा प्रशांतजींना मिळाला आहे. पनवेलचे नगराध्यक्ष, सतत दोन वेळा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येणे यामागे कार्यनिष्ठा, अविरत केलेली जनतेची सेवा, सर्वच क्षेत्रांत केलेले सामाजिक काम याचे फळ आहे. क्रीडा क्षेत्राचीही त्यांना आवड आहे. रायगड जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, रायगड जिल्हा हॉकी असोसिएशन, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन याद्वारे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे विविध खेळांसाठी उभी केलेली व्यवस्था या सर्वातून क्रीडा क्षेत्रातील कार्याची महती लक्षात येते. शिक्षण क्षेत्रात जनार्दन भगत शिक्षण संस्था, सीकेटी कॉलेज, शाहू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांसह अनेक शैक्षणिक संस्थांना दिलेले सक्षम नेतृत्व, मल्हार महोत्सव, पनवेल महोत्सव यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना सातत्याने दिलेले उत्तेजन यातून पनवेल शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी मोलाचा वाटा प्रशांतजींनी उचलला आहे.

पनवेल हे कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते. वाढते शहर व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने उभा राहिलेला उड्डाणपूल, साकारत असलेले जिल्हा रुग्णालय, प्रशासकीय भवन, अनेक वर्षे मागणी असलेला फोर लेन उरण मार्ग अशी विकासाची चौफेर दृष्टी प्रशांतजींकडे दिसून येते. खारघर टोल नाका हा जेव्हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झाला तेव्हा या प्रश्नावर त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि युती सरकारमध्ये निवडून येऊन टोल सूटदेखील मिळवून दाखविली. तीन वर्षांपूर्वी भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अल्प काळात सर्वच राजकीय पक्षांनी दखल घ्यावी अशा सुस्थितीत रायगड भाजपला त्यांनी नेऊन ठेवले आहे. आज पनवेल महापालिका, उरण, कर्जत नगर परिषद निवडणुका भाजपकडे आहेत. खोपोली आणि पेणमध्ये झुंजार लढत देऊन भाजप येत आहे याची जाणीव त्यांनी रायगडच्या राजकारणाला करून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रशांतजींचे 18-18 तास अविरत काम संघटना आणि समाजासाठी सुरू आहे. हे कमी की काय अशीच कामाची पद्धत असलेले पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांची वर्षापूर्वी साथ मिळाली आणि रायगड भाजपची वाढ अधिक वेगाने सुरू आहे. कामाची दखल घेऊन मा. मुख्यमंत्री यांनी सिडको अध्यक्ष ही नवीन जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर दिली. स्थानिक भूमिपुत्र अध्यक्ष झाल्यामुळे सिडको प्रकल्पग्रस्तांना आता न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

लहान वयात आलेली राजकीय परिपक्वता, मृदू स्वभाव, समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य उपाय शोधण्याची हातोटी, कार्यकर्त्यातील गुण ओळखून योग्य कामासाठी निवड, भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी या सर्व गुणांमुळे आमदार प्रशांत ठाकूर हे तरुण नेतृत्व रायगड जिल्ह्यातील सर्वव्यापी नेतृत्व होईल, यात शंका नाही. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा!

-दीपक बेहेरे, सरचिटणीस रायगड जिल्हा भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply