Breaking News

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त कायदेशीर सल्ला सप्ताह

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त  10 ते 16 एप्रिल पर्यंत मोफत कायदेशीर सल्ला सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. किशोर धाकड यांनी सांगितले आहे.

पनवेलमधील नामांकित वकील व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा रविवारी (दि. 10) वाढदिवस आहे. त्या निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोरोना काळात त्यांनी कार्यकर्ते व त्यांचाकडे समस्या घेऊन येणारे ज्यू. वकील व सहकार्यांना सर्वोतोपरी मदत केली आहे. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन काही वकील मित्रांनी त्यांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या  वाढदिवासापासून मोफत कायदेशीर सल्ला सप्ताह पाळण्याचे ठरवले आहे.

अ‍ॅड. किशोर धारकड यांनी 10 ते 16 एप्रिलपर्यंत मोफत कायदेशीर सल्ला सप्ताहाचे आयोजन केले आहे. ज्या कोणावर समाजातील कोणत्याही घटकाकडून, वर्गाकडून अन्याय, अत्याचार, फसवणूक झाली असेल त्यांनी या मोफत कायदेशीर सल्ल्याचा  लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply