रोहे : प्रतिनिधी
रोहा-मुरूड मार्गावर कवळटे अदिवासीवाडीजवळ रविवारी रात्री रस्त्याच्या संरक्षक कठड्याची एक बाजू पूर्णपणे कोसळल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, तर याच मार्गावर नाल्यालगत असलेला रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे. चार दिवस रोह्यात अतिवृष्टीमुळे कुंडलिका नदीला पूर आला होता. नदीकाठावरील गावांचे नुकसान झालेे. पावसाचा कहर मोठा असल्याचा प्रत्यय रोहा केळघरमार्गे मुरूड या रस्त्यावर आला. या मार्गावरील कवळठे गावच्या हद्दीत दोन ठिकाणी रस्ता खचला असून, एका ठिकाणी नाल्यात वाहून गेला आहे, तर दुसर्या ठिकाणी दरीच्या बाजूला रात्री 9 वाजता मोठी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.