नागोठणे ः प्रतिनिधी : निरंकारी मिशनच्या मुख्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार मिशनचे चौथे सद्गुरू हरदेवसिंग महाराज यांच्या 66व्या जयंतीचे औचित्य साधून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या कोंडगाव व रोहे शाखेच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परिसरात फाऊंडेशनचे कोंडगाव मुखी दगडू धामणे, रोहे मुखी हनुमंत चव्हाण, मंगेश रटाटे, देविदास तेलंगे, नामदेव म्हात्रे, देविदास थवई, प्रकाश भोकटे, राकेश बामगुडे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उद्घाटन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले.
या मोहिमेत प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर तसेच कर्मचारीवर्ग आणि राजू धामणे, विजय धामणे, विनायक तेलंगे, रमण शिर्के यांसह 250 भक्तगण सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यात 15 तालुक्यांत 20 सरकारी रुग्णालयांत ही मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण देशभरात 1160 ठिकाणी ही मोहीम राबवली असून साधारणतः साडेतीन लाख सदस्य यात सहभागी झाल्याचे हनुमान चव्हाण यांनी या वेळी सांगितले.