Breaking News

पक्षसंघटना वाढीसाठी महिलांनी पुढे यावे

भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांचे आवाहन

खोपोली : प्रतिनिधी – भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात महिलांनी सहभागी होऊन हा देश अधिक बलवान व शक्तिशाली होण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी मनापासून योगदान द्यावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी खोपोली येथे केले

खोपोली शहर मंडल महिला मोर्चा पदाधिकार्‍यांना अश्विनी पाटील व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, यावेळी अश्विनीताई पाटील मार्गदर्शन करीत होत्या. स्वतःचा संसार सांभाळताना महिलांनी सामाजिक कार्यातही अग्रेसर राहिले पाहिजे, असे मत व्यक्त करून त्यांनी, करोना प्रादुर्भाव काळात दिलेल्या योगदानाबद्दल महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर यांनी पदाधिकार्‍यांच्या जबाबदार्‍या व त्यांची कामे यावर विस्तृत मार्गदर्शन करताना, पक्ष संघटना वाढीसाठी महिलांनी अधिक वेळ द्यावा असे आवाहन केले.

जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांनी खोपोली शहर मंडल महिला मोर्चाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी शहर अध्यक्ष शोभाताई काटे, उपाध्यक्ष अपर्णा साठे, अमृता आंग्रे सरचिटणीस अश्विनी अत्रे, चिटणीस सीमा मोगरे, रेखा शिंदे, कोषाध्यक्षा विमल गुप्ते, सदस्य पार्वतीबाई दुधाळे, अनुसया सुपे, राजश्री सरदेशपांडे, सिंधू उबाळे, अनिता प्रधान, निशा दळवी, रूपाली पाटील, व प्रियंका गोखले या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना अश्विनीताई व मान्यवरांनी नियुक्तीपत्रे प्रदान केली. शहर सरचिटणीस अश्विनी अत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  महिला मोर्चाच्या जिल्हा कोषाध्यक्षा रसिका शेट्ये, संपर्कप्रमुख स्मिता मोडक, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा शोभाताई काटे, भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक तुकारामशेठ साबळे, भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply