Breaking News

अलिबाग तालुक्यात 20 पैकी 8 ग्रामपंचाती शेकापने गमावल्या

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयात निवडणूकीत  शेकापला जोरदार धक्का बसला आहे. शेकापने या निवडणूकीत 8 ग्रामपंचयती गमावल्या आहेत. त्यामुळे शेकाप विरोधकांकडे 5 ग्रामपंचयाती होत्या, त्या वाढून आता 12  झाल्या आहेत.

अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचयातींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात आले होते.  सोमवारी (दि. 25) मतमोजणी झाली. निवडणूक झालेल्या या 25 पैकी 20 ग्रामपंचायती शेकापकडे होत्या. त्यातील कुरकुंडी – कोलटेंबी, कुर्डूस, कुसुंबळे, चिंचोटी, बामणगाव, ढवर, ताडवागळे, आगरसुरे या आठ ग्रामपंचयाती शेकापने गमावल्या आहेत. तर काँगेे्रसकडे असलेली कावीर ग्रामपंचायत शेकापने जिंकली. शेकाप विरोधकांकडे 5 ग्रामपंचायती होत्या, त्या आता 12 झाल्या आहेत. शेकापकडे 20ग्रामपंचायती होत्या, त्यातील 12 राखण्यात त्यांना यश मिळाले तर एक ग्रामपंचायत त्यांनी विरोधकांकडून घेतली आहे.

अलिबाग तालुक्यातील आंबेपूर, चरी, बेलकडे, भिजली बोरघर, सुडकोली, पोयनाड, धोकवडे, रामराज, श्रीगाव, शहापूर, सहाण, वरंडे या ग्रामपंचायती शेकापने राखल्या. काँग्रेसकडे असलेली कावीर शेकापने जिंकली. बेलोशी, कुर्डूस, चिंचोटी, बामणगाव, आगरसुरे,सारळ या ग्रामपंचायतींवर कॉग्रेसची सत्ता आली. कुसूंबळे, कुरकूंडी – कोलटेंबी, ताडवागळे, थळ, चौल आणि ढवर या ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत.

चौकट :

शेकाप विरोधी आघाडीचे सरपंच

प्रतिभा संजय पवार (चौल), सुनील सुधाकर पत्रे (थळ), मीना कृष्णा लोभी (कुसुबळे), रुपाली नवीन शिर्के (ताडवागळे), दिलीप पाटील (कुरकुंडी कोलटेभी), विश्वनाथ गावंड (ढवर), कृष्णा भोपी (बेलोशी), जागृती मिलिंद पेढवी ( आगरसुरे), अनंत सोमा पाटील (कुर्डुस), नंदकुमार राऊत (बामणगाव), बंदीता बाबुराव पाटील (चिंचोटी), अमृता अमित नाईक (सारळ)

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply