Monday , October 2 2023
Breaking News

दिव्यांगांच्या पीसीओ बुथचे बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये रूपांतरण; सिडकोची मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

दिव्यांगांतर्फे चालवण्यात येत असलेल्या पीसीओ बुथचे रूपांतरण बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये करण्यास व त्या ठिकाणी इतर वस्तू विकण्यास, पीसीओ बुथचे क्षेत्रफळ 4.8 चौमी (51.66 चौ.फूट) वरून 15.851 चौमी (200 चौ.फूट)पर्यंत वाढवण्यास, तसेच सध्याचे लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्सवर असलेले पीसीओ बुथ भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सिडको महामंडळाच्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यामुळे हातभार लागणार आहे.

मोबाईल फोनच्या वापरामुळे पीसीओ बुथचा व्यवसाय आजच्या काळात कालबाह्य झाल्याने दिव्यांगांना पीसीओ बुथमधून उत्पन्न मिळत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या पीसीओ बुथद्वारे इतर वस्तू विकण्यास आणि त्या अनुषंगाने पीसीओ बुथचे नाव

बहु-उपयोगिता केंद्र करण्यास सिडको संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या पीसीओ बुथमध्ये झेरॉक्स सेंटर, फ्लोरीस्ट (फुलांचे बुके), स्टेशनरी वस्तू, शीतपेय, मिनरल वॉटर, सुके खाद्यपदार्थ व चॉकलेट्स विक्री याबरोबरच आता रेल्वे व मेल तिकीट विक्री, टूर्स व ट्रॅव्हल्स बुकिंग, तयार खाद्यपदार्थ विक्री, कॉम्प्युटर व मोबाईल दुरूस्ती, वर्तमानपत्र-पुस्तक विक्री, ऊस-ज्यूस विक्री केंद्र, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री, शिलाई केंद्र, लॉन्ड्री व ड्राय क्लिनर्स अशा प्रकारचे अतिरिक्त वाणिज्यिक वापर करण्यासाठी संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिका यांच्या अधिकार क्षेत्रात येणार्‍या अशा सर्व केंद्रांचे हस्तांतरण सिडकोतर्फे त्वरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, त्याप्रमाणे संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. सिडको अधिकार क्षेत्रातील केंद्राची जागा वाढवण्याबाबत आणि केंद्र 60 वर्षांच्या भाडेकराराने देण्याबाबतची कार्यवाही सिडकोमार्फत करण्यात येणार आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply