पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. 4) पनवेलला भेट देणार आहेत. या दौर्यात ते येथील परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांसंदर्भात रुग्णालय व महापालिका प्रशासनाशी चर्चा करणार आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरदिवशी किमान 100हून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण होऊन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिका प्रशासनाकडून काय उपचार आणि उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस घेणार असून, या संदर्भात चर्चाही करणार आहेत. फडणवीस हे शनिवारी सकाळी 10.30 वाजता पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर 11.30 वाजता पनवेल महापालिकेत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संवाद साधणार आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …