पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या वढाव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत आंनदाचे वातावरण आहे.
वढाव येथील थेट सरपंच पदाच्या भाजप उमेदवार पूजा अशोक पाटील यांनी 1560 मतांनी विजय मिळविला. तर ग्रामपंचायत सदस्य पदावर ओमकार गजानन म्हात्रे, ज्योती हनुमान म्हात्रे (प्रभाग क्र 1), नितेश गोपीनाथ म्हात्रे (प्रभाग क्र 2), प्रमोद नागाजी म्हात्रे (प्रभाग क्र 3), निलेश बळीराम म्हात्रे, निलिमा नरेश म्हात्रे, सविता अरूण म्हात्रे (प्रभाग क्र4) हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर होताच माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे रायगड लोकसभा मतदार संघ विस्तारक अविनाश कोळी, जि.प. चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण विधान सभा मतदार संघ विस्तारक पंकज शहा, कामगार मोर्चा अध्यक्ष विनोद शहा, अशोक पाटील, अनंत पाटील, व्हि. बी. पाटील, जितेंद्र म्हात्रे, विनोद पाटील, ज्योती म्हात्रे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला कौल दिला आहे. आगामी निवडणूकीची ही नांदी असून, पेण विधानसभा मतदार संघामध्ये कमळ फुलविल्याशिवाय राहणार नाही.
-मिलिंद पाटील, जिल्हा प्रवक्ते, रायगड भाजप.