Breaking News

‘बाटा’ला ठोठावला नऊ हजार रुपयांचा दंड

चंदीगड ः वृत्तसंस्था

सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल बाटा इंडिया लिमिटेडला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंदीगडमधील एका ग्राहकाने पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल ‘बाटा’विरोधात तक्रार केली होती. ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत चंदीगड ग्राहक मंचाने ‘बाटा’ला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

चंदीगडचे रहिवासी असणारे दिनेश यांनी आपल्या तक्रारीत सांगितले होते की, आपण 5 फेब्रुवारी रोजी ‘बाटा’मधून शूज विकत घेतले होते. यासाठी आपल्याला 402 रुपयांचे बिल देण्यात आले. यामधील तीन रुपये पेपर बॅगसाठी आकारण्यात आले होते. दिनेश यांनी सांगितले की, आपल्याला तीन रुपये आकारत बाटा पिशवीच्या सहाय्याने आपल्या ब्रँण्डचे प्रमोशन करत होते, जे चुकीचे आहे. तक्रारदार दिनेश यांनी सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल तीन रुपये रिफंड करण्याची तसेच भरपाई देण्याची मागणी केली. बाटाने मात्र आरोप फेटाळून लावले. ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारणे सेवेत त्रुटीच आहे व आपली वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे, असे ग्राहक मंचाने सांगितले. बाटाला पिशवीचे पैसे रिफंड करण्याचा आणि खटल्यासाठी आलेला एक हजार रुपये खर्च जमा कऱण्यास सांगितले आहे, तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 3000 रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply