Breaking News

ओवेपेठ विद्यालयात क्रीडा महोत्सव

पनवेल ः प्रतिनिधी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव दि. 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. या महोत्सवात खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. म्हात्रे सर व क्रीडा शिक्षक श्री. संभाजी जाधव सर यांच्या उपस्थितीत झाला. सदर क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळ (100 मी. धावणे, गोळाफेक, लांब उडी, बुक बॅलन्सिंग) तसेच सांघिक खेळ

(कबड्डी, शटल रिलेे, डॉज बॉल, रस्सीखेच, क्रिकेट) इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर क्रीडा महोत्सवास संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, सचिव गडदेसर, सहसचिव श्री. जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply