![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/08/mubai-pune-1024x577.jpg)
खोपोली ः वार्ताहर
सिग्नल व्यवस्था, रेल्वे टॅ्रकची दुरुस्ती व घाटातील दरड भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई-पुणे सर्व प्रकारची रेल्वेसेवा दि. 16 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकडील प्रवासी लोकलने खोपोलीला येऊन खोपोलीहून महामार्गमार्गे पुण्याकडे जात आहेत. खोपोली सिटी बसस्थानक व खोपोली मध्यवर्ती बस स्थानकांत पुण्याकडे जाणार्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने त्यांची कोणतीही गैरसोय किंवा खासगी प्रवासी वाहनचालकांकडून अतिरिक्त भाडे घेण्यात येऊ नये यासाठी खालापूरचे तहसीलदार यांनी खोपोली पोलीस, खोपोली बसस्थानक नियंत्रक व येथील सामाजिक संस्थांना सहकार्य करण्यास सांगितले आहे. याबाबत खोपोली आपत्कालीन मदतीसाठी सक्रिय सामाजिक ग्रुपचे सदस्यही सतत लक्ष ठेवून असून, कोणत्याही प्रवाशाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहेत. खोपोली नगरपालिका परिवहन विभागाकडूनही जास्तीच्या फेर्या मारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.