Breaking News

ईश फाऊंडेशनतर्फे ‘रिअल हिरों’चा सन्मान

पनवेल : वार्ताहर

खारघर सेक्टर 5 (गोल्फ कोर्स) येथील डोंगरावर 18 जुलै रोजी अडकलेल्या 118 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्याचे कार्य खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी ईश फाऊंडेशनने लाइफ सेव्हीअर अ‍ॅवॉर्ड रिअल हिरो या नावाने प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.

या वेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कीर्ती मेहरा, संकल्प प्रतिष्ठान खारघरचे सरचिटणीस अजय माळी, फाऊंडेशनचे सुनील सचदेवा, पिंकी शर्मा, अनुज मित्तल, हरिंदर सिंग मान, दिव्या मेहरा, दिलीप भाई जेना, समाजसेवक संतोष तांबोळी, फाऊंडेशनच्या खजिनदार आरती मेहरा, हेमंत म्हात्रे, हरिंदर सिंग आदी उपस्थित होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply