Breaking News

खोपोली-पनवेल बसला अपघात

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे महामार्गावरून चाललेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी एसटी बस ट्रकवर आदळली. विणेगाव (ता. खालापूर) हद्दीत बुधवारी (दि. 14) सकाळी झालेल्या या अपघातात बस चालकासह एकूण 15 लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस (एमएच-20, बीएल-2232) बुधवारी सकाळी खोपोलीहून पनवेलला जात होती. विणेगाव हद्दीतील व्हाइट हाऊस हॉटेलसमोर पुढे चाललेल्या ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने एसटी बस ट्रकवर आदळली. या अपघातात बसचालक शशिकांत शिंदे, वाहक ज्योती इंगळे यांच्यासह रोहित याज्ञीक, पौर्णिमा जाधव, अकबर  दुस्ते, प्रमिला चव्हाण, राकेश किरकिंडे, अफजल पठाण, दीपाली शिंदे, दामिनी म्हामुणकर, अपराज शेख, प्रतीक व मान शेख, जेकब खोपोलीवाला आदी प्रवासी जखमी झाले. त्यांना चौक येथील ग्रामीण रुग्णालय, खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र व कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्जत आगारप्रमुख यादव व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून खालापूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. बस खोपोली  स्थानकात दुरुस्तीसाठी उभी करण्यात आली आहे.फ

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply