Breaking News

राष्ट्रीय किक बॉक्सिंगमध्ये मानसी पवारला रौप्यपदक

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबईतील मानसी युवराज पवार हिने गोवा राज्यात झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत देशभरातून 60 महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. मानसी पवार ही 23 वर्षीय मुलगी ऐरोलीत राहते.पत्रकारिता व न्यू मीडिया पदवी प्राप्त मानसीला किक बॉक्सिंगची आवड आहे. म्हणून तिने मागील सहा महिन्यांपासून आशिष व शीतल राणे या दाम्पत्याकडून किक बॉक्सिंगचे धडे गिरवले. त्यानंतर नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मानसीने कांस्यपदक प्राप्त केले होते. गोवा येथील वाको या संस्थेने 30 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये मानसीने रौप्यपदकाला गवसणी घातली. त्यामुळे ऐरोली परिसरात तिचे अभिनंदन होत आहे.

प्रशिक्षक माझ्यावर खूप चांगली मेहनत घेत आहेत, तसेच माझी कष्ट करण्याची तयारी असून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मानस आहे. माझे शहर नवी मुंबई, राज्य व देशाचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

-मानसी पवार, किक बॉक्सिंगपटू

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply