Breaking News

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

मुंबई : प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणार्‍या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील पाच अधिकार्‍यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र शिवाजी जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलीस उपअधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकीनाका विभागातील सहायक पोलीस आयुक्त मिलिंद भिकाजी खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंड कमांडंट हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती कलप्पा सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

रामचंद्र जाधव यांना हे तिसरे राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तर राजाराम पाटील यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. होमगार्ड, नागरी सेवा आणि अग्निशमन विभागात महाराष्ट्राला एकही पदक मिळाले नाही.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply