Breaking News

बाळसई येथे शैक्षणिक साहित्यांचे वाटप

रोहा ः प्रतिनिधी

नागोठणेजवळ असलेल्या बाळसई प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने गावातील व्यावसायिक वसंत भोसले यांनी गुरुवारी शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. ध्वजवंदनानंतर ऐनघर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पोलीस पाटील पंकज कोकाटे, वसंत भोसले, मंगेश जाधव, मनोज भोसले, नीलेश मेणे, किशोर नावले, कृष्णा मुंडे, दत्ताराम कोकाटे, रामचंद्र तेलंगे, चंद्रकांत जाधव, दामोदर शिंगडे, राजाराम मुंडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply