Breaking News

अपंग क्रांती संघटनेचे चर्चासत्र

पनवेल : बातमीदार

दिव्यंगांच्या न्याय्य हक्क व सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षापासून कार्य करत असणारी अपंग क्रांती संघटनेची पदाधिकारी मंडळाची विशेष नियोजन सभा व चर्चासत्र आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा शांतिवन येथे आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे तालुकाध्यक्ष बाळाराम रोडपालकर होते. सभेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील होते. या वेळी अपंगांच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा करण्यात आली. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने मोहीम रबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी विलास फडके, संतोष ढोरे, प्रिया रोडपालकर आदी उपस्थित होते.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply