Breaking News

बुमरा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सकडून कौतुक

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

भारताच्या जसप्रीत बुमराने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली असून, सध्याच्या घडीला तो विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने बुमराची स्तुती केली.

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला अखेरच्या चेंडूवर पराभूत केले. कमिन्सनेच विजयी धाव घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. बुमराने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करताना 19व्या षटकात दोन फलंदाजांना बाद करीत सामना भारताच्या बाजूने फिरवला होता. त्याच्या या कामगिरीची कमिन्सने प्रशंसा केली आहे.

‘बुमरा अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजीबरोबरच चेंडूचा अचूक टप्पा राखण्याची कलाही त्याला अवगत आहे. या दोन गोष्टी ज्या गोलंदाजाकडे असतात तो कोणत्याही फलंदाजाला आव्हान देऊ शकतो, असे 25 वर्षीय कमिन्स म्हणाला.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply