उरण ः वार्ताहर
उरण येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 माता रमाई महिला मंडळ बौद्धवाडी व तेजाब मस्के, उद्योजक प्रकाश ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे वह्या व शालोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त (बंदर विभाग) विठ्ठलराव दामगुडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल आहेर, डॉ. मनोज भद्रे, नगरसेवक रवी भोईर, नगरसेविका स्नेहल कासारे, शिवाजी ठाकूर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्याचप्रमाणे उरण येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, चिटणीस विजय पवार, सरचिटणीस रोशन गाडे, खजिनदार अनंत जाधव, सहखजिनदार सुरेश गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल कासारे, संजय पवार, अमर गायकवाड, हरिचंद्र गायकवाड, विनोद कांबळे, हर्ष कांबळे, संजय गायकवाड, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सकपाळे, उपाध्यक्षा संगीता जाधव, चिटणीस करुणा भिंगावडे, खजिनदार सविता साळवी, उपासिका, उपासक व सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.