Breaking News

कृष्णप्पाचा काला; एकाच सामन्यात आठ विकेट्स आणि 39 चेंडूंत शतक

बंगळुरू : वृत्तसंस्था

कर्नाटक आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर कृष्णप्पा गौतम याने कर्नाटक प्रीमियर लीग 2019मध्ये धम्माल उडवून दिली आहे. शुक्रवारी (दि. 23) झालेल्या सामन्यात त्याने एकाच सामन्यात आठ विकेट्स घेताना 39 चेंडूंत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रमही केला. बेल्लारी टस्कर्सकडून शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळताना कृष्णप्पा गौतमने ही कमाल केली आहे.

कृष्णप्पा गौतमची कामगिरी ही ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे, मात्र केपीएल सामन्यांना टी-20 म्हणून दर्जा नाही. कृष्णप्पाने एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शिवमोगा लायन्सविरुद्ध खेळलेल्या सामन्यात 39 चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने 56 चेंडूंत एकूण 134 धावा केल्या. त्यात 13 षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. कर्नाटक प्रीमिअर लीग संघाकडून हे आतापर्यंतचे सर्वाधिक वेगवान शतक आहे. फलंदाजीबरोबर त्याने गोलंदाजीतही सरस कामगिरी केली. चार षटकांत आठ फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या जादुई फिरकीपुढे शिवमोगा लायन्सचे फलंदाज टिकूच शकले नाहीत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply