Breaking News

वडाळे तलावाच्या वॉकिंग ट्रॅकवर रक्ताचा सडा

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील महानगरपालिका उभारीत असलेल्या वडाळे तलाव वॉकिंग ट्रॅकवर रविवारी (दि. 21) सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचा थारोळा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील वडाळे तलावात रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एक जागरुक नागरिकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्त पडलेले आढळल्याने त्याने तत्काळ पनवेल शहर पोलिसांसोबत संपर्क साधून याबाबत माहिती देताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक गोपाळ कोळी व त्यांचे पथक पोहचले. तातडीने त्या ठिकाणी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला एक कपडा आढळून आला आहे. अधिक तपासाच्या दृष्टीने पनवेल शहर पोलिसांची वेगवेगळी पथके परिसर पिंजून काढत आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply