रोहे : प्रतिनिधी
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली संकल्पना गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन करणार्या रोह्याच्या राजाच्या मोठ्या मूर्तीचे रविवारी (दि.25) भाटे वाचनालयाच्या हॉलमध्ये जल्लोषात आगमन झाले .
रोहे शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार किशोर वेदपाठक यांच्या गणपती कारखान्यात ही ‘श्रीं‘ची सुबक मूर्ती साकारली आहे. रविवारी श्रींची मोठी मूर्ती आणण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेश काफरे, माजी अध्यक्ष दिलीप वडके, किशोर तावडे, निखिल दाते, निलेश शिर्के, उत्सव समिती कार्याध्यक्ष प्रीतम देशमुख, अॅड. हर्षद साळवी, विश्वजित लुमण यांच्यासह उत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रींची छोटी मूर्ती प्रथेप्रमाणे पालखीतून आणण्यात येईल.