नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढण्याचा निर्णय भारताने घेतला. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. इतर देशांनीही या प्रकरणी भारताला पाठिंबा दर्शवला. पण पाकिस्तानला मात्र हा निर्णय रूचला नाही. पाकिस्तानातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी यावर टीका केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही या वर टीका केली आहे. पण त्याच्या या टीकेला उत्तर देत भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सणसणात शाब्दिक चपराक लगावली.
काश्मीरी जनतेच्या समर्थनार्थ पंतप्रधान इम्रान खान यांनी एक कार्यक्रम सुरू केला आहे. यास तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्या. शुक्रवारी दुपारी 12 वाजता मी मजार-ए-कैद येथे उपस्थित राहणार आहे. आपल्या काश्मीरी बांधवांच्या समर्थनासाठी तुम्हीदेखील माझ्यासोबत या. 6 सप्टेंबर रोजी मी शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे, असे आफ्रिदीने ट्विट केले.