पेण : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांचा विजयाचा अश्वमेघ अत्ता कोणीही रोखू शकत नाही. मागील सहा लोकसभा निवडणुकीत त्यांना निर्विवाद बहुमत मिळाले असून याही वेळी ते मोठ्या मताधिक्याने निवडुन येतील, असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या वेळची लोकसभेची लढाई ही धनशक्ती विरूद्ध जनशक्तीची लढाई आहे. भ्रष्टाचाराविरोधात शिष्टाचाराची आहे. अनंत गिते हे सहावेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत तसेच तीनवेळा केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे.
अवजड उद्योगाची वर्षाला एक लाख 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे तर सार्वजनिक उद्योगांची 18 लाख कोटी वर्षाला उलाढाल आहे.
लाखो कोटींची उलाढाल असलेले मंत्रालयांचा कारभार चालवित असतानाही अनंत गिते यांच्यावर कोणताही डाग नाही. त्यांनी स्वच्छ कारभार करून आपली प्रतिमा निष्कलंक ठेवली आहे. तर दुसर्या बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी सुनिल तटकरे यांच्यावर जलसंपदा मंत्री असताना 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे.
अनंत गिते यांनी या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत. पनवेल ते पेण लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे, असेही ते म्हणाले.
पेण खारेपाट विभागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युती शासनाच्या माध्यमातून 38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनंत गिते यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. तरी सुज्ञ मतदारांनी आपले मत विकासाला व निष्कलंक व्यक्तीमत्वाला म्हणजे अनंत गिते यांना द्या
-प्रकाश देसाई, शिवसेना नेते