Breaking News

परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज

ग्रुप बुकिंगची सुविधा, महाड आगारातून 70 बसेसचे बुकिंग

महाड : प्रतिनिधी

गणेशोत्सवाकरिता कोकणात आलेल्या गणेशभक्तांसाठी परतीचा प्रवास सुखकर व्हावा, म्हणून जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आतापर्यंत 70 एसटी बसेस बुक केल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी परतीच्या प्रवासापूर्वी दोन दिवस आधीच ग्रुप बुकिंग करावे. अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी वाहतूक निरीक्षक शिवाजी जाधव (मोबाईल 921055366) यांच्याशी संपर्क साधावा, आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवाकरिता येण्यासाठी एसटीने महाडसह संपूर्ण कोकणात नियमित बसेस व्यतरिक्त जादा बसेस सोडल्या आहेत. याचा फायदा कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना झाला. आता दीड आणि पाच दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर पुन्हा मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरात परत जाण्यासाठी एसटीने ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऑनलाईन केल्याने या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. महाड आगारातून परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत 70 बसेसचे बुकिंग झाले असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून दिली. एसटीच्या महाड आगारातून महाड, आंबेत आणि पोलादपूर या ठिकाणाहून या बसेस बुकिंग झाल्या आहेत. आंबेतमधून 2 बोरीवली तर नालासोपारा व मुंबई करीता प्रत्येकी एक आणि पोलादपूरमधून पनवेल, बोरीवली, नालासोपारा, मुंबई, भांडूप या ठिकाणी जाण्यासाठी 16 बसेस बुकिंग झाल्या आहेत. महाड पोलादपूर, आणि आंबेत अशा मिळून जवळपास 70 बसेस बुकिंग झाल्या आहेत.

पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे शनिवारी (दि. 7) विसर्जन होणार आहे. यानंतर एसटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळते. त्यांची गैरसोय होवू नये म्हणून एसटी प्रशासनाने ग्रुप बुकिंग सुविधा दिली आहे. आतापर्यंत सुमारे 70 बसेस बुकिंग झाल्या आहेत.  प्रवाशांनी परतीच्या प्रवासासाठी आगावू बुकिंग करावे.

-शिवाजी जाधव, वाहतूक निरीक्षक, महाड एसटी आगार

महाडमधून परतीच्या प्रवासाच्या जादा बसेस

महाड ते भांडूप : दुपारी 01.00, दुपारी 01.15

महाड ते बोरीवली : दुपारी 12, 12.45, 01.00, 01.15, 2.45, 02.15, 02.30, 02.45, 03.00, 03.15, 04.00, सायंकाळी 05.30, 05.45.

महाड ते कल्याण : सकाळी 10.00, 10.15,

महाड ते पुणे : सकाळी 11, रात्री 10

महाड ते पनवेल : सकाळी 07.30, 09.00,10.30,11.00, दुपारी 12.00, 01.00, 2.15, 04.00, रात्री 9.00

महाड ते नालासोपारा : दुपारी 12

महाड ते मुंबई : सकाळी 07.15, 10.00

महाड ते भाईंदर : 01.30

महाड ते परळ : दुपारी 12.00

आंबेत ते बोरीवली : सकाळी 10.00, 12.00

आंबेत ते नालासोपारा : 12.30, आंबेत ते

मुंबई 01.00

पोलादपूर ते बोरीवली : 10.00, 10.30, 11.00, 11.30, 01.45

पोलादपूर ते मुंबई : 08.00, 08.30

पोलादपूर ते नालासोपारा 10.45, 01.00, 2.30

पोलादपूर ते पुणे : 09.00

पोलादपूर ते ठाणे : 07.15, 07.45, 02.15, 2.45

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply