Breaking News

भिवपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक मार्गिका पाण्याखाली

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात प्रवाशांना येण्यासाठी असलेला रस्ता आणि मुंबईकडे जाणारी एक मार्गिका पाण्याखाली गेली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवपुरी रोड स्टेशनमध्ये जाणे कठीण होऊन बसले आहे. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या कर्जत एन्डकडे डिकसळ हे गाव रेल्वे मार्गाला लागून आहे. त्यापुढे अनेक गावे असून, तेथील लोकांचा लोकल प्रवास हा भिवपुरी रोड स्टेशनवरून होत असतो. या स्टेशनकडे येणार्‍या रस्त्यावर जोरदार पाऊस झाला की पाणी  येते. मंगळवारी या रस्त्यावर पाणी भरल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रेल्वे मार्गातून चालत स्टेशन गाठावे लागत आहे. या रस्त्याच्या खालून वाहणारा नाला बिल्डरने बंद केल्याने  पावसाचे पाणी जाण्याची नैसर्गिक वाट बंद झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून ते बाजूच्या रस्त्यावर साचून राहत आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिवपुरी रोड स्थानकात प्रवेश करणारा रस्ता आणि मध्य रेल्वेची एक मार्गिका पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे बाजूच्या डिकसळ, गारपोली, पाली वसाहत, उमरोली, आषाणे, कोषाणे या गावातील लोकांना स्टेशनवर येणे कठीण होऊन बसले आहे, तसेच रस्त्यालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नैसर्गिक नाला तत्काळ सुरू करण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी मागणी उमरोली ग्रामपंचायत आणि डिकसळ ग्रामस्थांनी कर्जत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply