Breaking News

जनसंपर्क कार्यालय महत्त्वाचा दुवा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : वृत्त नागरिकांच्या समस्या सोडवत त्यांची सेवा करण्यासाठी आणि परिसराचा विकास साधण्यासाठी जनसंपर्क कार्यालय महत्त्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले.  पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते; तर विकासकामांचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (10 फेबु्रवारी) झाले. त्या वेळी आमदार ठाकूर बोलत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर मोरे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जगदीश घरत, संदीप नारायण पाटील, शैलेश पाटील, बाळाराम गायकवाड, रावसाहेब काशीद, नौशाद काशीद, सदा काशीद, उमेश रडे, सचिन पाटील, प्रशांत आवळे, मनीषा चिले, गौरी पवार, अमेश तारेकर, कल्पना ठकेकर, पप्पू साळवी, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, शारदा माने, लक्ष्मी चव्हाण, सुहास नलावडे, शोभा पन्हाळे, टेमकर, जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, आपले सरकार सक्षम राष्ट्रनिर्माणासाठी काम करीत असून, हे चांगले कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. आमदार महोदयांनी या वेळी नगरसेविका सुशीला घरत यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, नगरसेविका सुशीला घरत या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असून, स्वखर्चाने विकासकामेही करीत आहेत. पनवेल व परिसराचा विकास करण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी सतत प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत राहू, असेही त्यांनी आश्वस्त केले.  प्रास्ताविकात नगरसेविका सुशीला घरत यांनी म्हटले की, सिडको अध्यक्ष झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको परिसरातील पाणी, रस्ते, मलनिःसारण वाहिन्या, जीर्ण जलवाहिन्या, उद्यान, मैदाने, क्रीडांगण व इतर सोयीसुविधांचा व त्यातील समस्यांचा आढावा घेऊन त्या नागरिकांच्या सोयीसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला. नवीन पनवेललाही त्याचा फायदा होणार आहे.या वेळी अमृतवेल अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन सेक्टर 14, तोरणा पीएल 6 ओनर्स असोसिएशनमधील पेव्हरब्लॉक, तसेच ई-1/1 ते 22, सेक्टर 14च्या कम्पाऊंड वॉलचे बांधकाम, सुशोभीकरण व रंगरंगोटीच्या कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे व विकासकामांचा आलेख वाढविण्याचे काम केले असून, त्यांच्या कार्यतत्पर प्रणालीमुळे पनवेलचा विकास झपाट्याने झाला आहे. 
-सुशीला घरत, नगरसेविका

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply