चौक : रामप्रहर वृत्त चौक विभागातील आसरे आदिवासी वाडीतील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचा महामेरू आणणारे जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या हस्ते, तसेच खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम चौक येथे झाला. भाजपचे चौक जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, आसरे गावातील धडाडीचे कार्यकर्ते व बुथ अध्यक्ष गणेश गायकवाड आणि युवा मोर्चा चौक जि. प. विभाग अध्यक्ष दर्शन पोलेकर यांच्या प्रयत्नांमुळे आसरे आदिवासी वाडीतील भगवान वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील 50 कार्यकर्त्यांनी आणि धारणीतील मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमास भाजपचे खालापूर तालुका चिटणीस प्रसाद पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश कदम, तालुका सरचिटणीस स्वप्नील मुकादम, उपाध्यक्ष राकेश ठोंबरे, विजय (बंड्या) ठोसर, वडगाव जि. प. विभाग अध्यक्ष नंदू सोनावणे, वासांबे जि. प. विभाग अध्यक्ष दिलीप पारंगे, मोहोपाडा अध्यक्ष वामन धुळे, चौक अध्यक्ष प्रकाश घोगरे, ज्येष्ठ नेते दत्ता जांभळे, पंढरीनाथ दरेकर, विश्वनाथ पाटील, संदीप शिंदे, किशोर देवधरे आदी उपस्थित होते. या वेळी आसरे वाडीतील मारुती वाघमारे, अंकुश वाघमारे, विनोद वाघमारे, चंदर वाघमारे, रवी वाघमारे, सुनील वाघमारे, विष्णू पवार, रवी कातकरी, बारकु वाघमारे, सोन्या वाघमारे, हिरामण पवार, बाळू वाघमारे, जयदास वाघमारे, सतीश वाघमारे, कैलास पवार, सुनील कातकरी, नितीन पवार, अंकुश कातकरी, किसन वाघमारे, तसेच धारणी गावातील सचिन घरत, रोशन घरत, अतिष रसाळ व नितेश ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
