Breaking News

दोन कोटी भारतीयांचा डीटीएचला राम राम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

टेलिव्हिजन आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या घोषनेनंतर भारतात नवे दर लागू झाल्यानंतर डीटीएच सेवा महाग झाली आहे. डीटीएच सेवेसह केबलच्या बिलात भरमसाठ वाढ झाल्याने लोक हैराण झाले आहेत. ट्रायने लोकांना पसंतीचे चॅनेल निवडण्याची मुभा दिली असली, तरी डीटीएच सेवा महाग झाल्याने देशभरातील तब्बल दोन कोटी लोकांनी डीटीएच सेवा सोडल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीच्या दुसर्‍या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या केबल बिलात 25 टक्के वाढ झाली आहे. या दरवाढीविरोधात वेळोवेळी संताप व्यक्त केल्यानंतरही त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याने भारतीय डीटीएच आणि केबल सेवा सोडण्याला लोक पसंती देत आहेत. मार्च 2017 मध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने ब्रॉडकास्टिंग आणि केबल सर्व्हिससाठी नवीन फ्रेमवर्क तयार केला आहे. तो 29 डिसेंबर 2018 ला लागू करण्यात आला. या नियमांनुसार ग्राहकांना आपल्या पसंतीचे चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. हा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना स्वस्त व कमी पैशांत डीटीएच सेवा व केबल सेवा मिळेल, असे मानले जात होते, परंतु हे उलट झाले. आधी कमी पैशांत मिळणारी सेवा महाग होत अव्वाच्या सव्वा झाली. केबलच्या दरातही प्रचंड वाढ झाली. चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य असले, तरी सेवा महाग झाल्याने ग्राहकांनी डीटीएच व केबलकडे पाठ फिरवली आहे.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply