Breaking News

नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचे एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. संयुक्त राष्ट्र सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या सभेत भाषण करणार आहेत. त्यामुळे, संयुक्त राष्ट्र सभेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांविषयी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारा अनुच्छेद 370 आणि 35 ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले. या निर्णयाला विरोध म्हणून पाकिस्तानने अनेक देशांचे दरवाजे ठोठावले. यासाठी संयुक्त राष्ट्रातही दाद मागितली, पण त्यांच्या पदरी निराशा आली. ‘भारत आणि पाकिस्तानचे सगळे मुद्दे हे दोन देशांमधले आहेत. त्यामुळे दुसर्‍या देशांनी यामध्ये पडण्याचे कष्ट घेऊ नयेत,’ असं मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याकडे या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. जुलै महिन्यात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी आपल्याला काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी सांगितले होते, असा दावा केला होता, पण यानंतर ट्रम्प यांनी यू-टर्न घेतला.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply