Breaking News

संजय गांधी निराधार योजनेची 53 प्रकरणे मंजूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समितीचे अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) पनवेल तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत नायब तहसिलदार रूपाली सोनावणे यांना कार्यालयात मंजुरीसाठी आलेल्या एकूण 58 लाभार्थींच्या अर्जांची योजनानिहाय माहिती देण्यात आली. या सर्व अर्जांची समितीचे सदस्य यांनी छाननी केली. त्यापैकी 53 परिपूर्ण अर्ज मंजूर करण्यात आले व पाच लाभार्थींचे कागदपत्र अपूर्ण असल्याने त्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी सबंधीत लाभार्थींकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी समितीचे सदस्य के. जी. म्हात्रे, जयराम मुंबईकर, शंकुनाथ भोईर व संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून आशा जोशी, लिपीक गौतम कांबळे व मनिषा पाटील हजर होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply