पनवेल : रामप्रहर वृत्त
पर्यावरणाचा ध्यास व मुलींची सुरक्षितता विचारात घेऊन लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक स्तुत्य उपक्रम राबविला गेला. सॅनिटरी पॅड्स वेंडिंग मशिनचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
आरोग्याच्या दृष्टीने व स्वच्छता लक्षात घेऊनच या उपक्रमाची सुरुवात झाली. भविष्यात विद्यालयातील इतरही विद्यर्थिनींना याचा फायदा होणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक जाणिवेतून एल. आर. टी. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे मशिन शाळेला भेट देण्यात आले. अजय जैन, डिस्ट्रीक्ट मॅनेजर नरेश गुमार गुप्ता, प्रेसिडंट हरिष चंद्रा आरोरा, व्ही. पी. लता गुप्ता, निर्मला अरोरा व रूपाली वाघमारे यांच्या सहकार्याने शाळेमध्ये ही सोय उपलब्ध झाली. शाळेतील केवळ विद्यर्थिनीच नव्हे तर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महिलांनाही या मशिनचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व आभार मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी मानले. या वेळी शाळेच्या पर्यवेक्षिका कुुसुम म्हात्रे, सबिना मिनानी उपस्थित होत्या.