Breaking News

लिखिते हॉस्पिटलमधील आगळावेगळा गणेशोत्सव

पनवेल ः प्रतिनिधी

हॉस्पिटल म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ते रुग्ण. त्यांचे रडणे-ओरडणे आणि तेथील  औषधांचा वास. हॉस्पिटलमध्ये कधीही जा यापेक्षा वेगळे वातावरण नसते. पण गणेशोत्सवात पनवेलमधील लिखिते हॉस्पिटल मात्र याला अपवाद असते. दहा दिवस येथील वातावरणात सगळीकडे उत्साह भरलेला दिसून येतो. सकाळ संध्याकाळ गणेशाच्या आरतीला सर्व जाती- धर्माचे लोक एकत्र आलेले पाहायला मिळतात.   

पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील ओम साईप्रसाद सोसायटीमधील लिखिते हॉस्पिटल म्हणजे अपघातातील जखमींचे आणि लहान मुलांचे हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पनवेलमध्ये लिखिते हॉस्पिटल आज अत्याधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल म्हणून प्रसिध्द आहे. पनवेल शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पुष्कर आणि त्यांची लहान मुलांची डॉक्टर असलेली पत्नी स्वाती स्वत: त्यामध्ये उत्साहाने सहभागी होत असतात.

डॉक्टर लिखिते यांचे कुटुंब मूळचे कल्याण जवळील मुरबाड (किरवली) गावातील.  डॉक्टर पुष्कर यांची शासनातर्फे  मेडिकल ऑफिसर म्हणून प्रथम नेमणूक पनवेल तालुक्यातील आपटे येथे झाली. त्यामुळे पनवेलशी त्यांचे संबंध आले आणि ते पनवेलकर झाल्याचे अभिमानाने सांगतात.  26 डिसेंबर 2016 रोजी आज असलेल्या वास्तूत लिखिते पेडीएट्रिक अ‍ॅण्ड ऑर्थोपेडिक सुपर स्पेशलिटी क्लिनिक सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये दाखल होणारा रुग्ण हा माऊथ पब्लिसिटीवर आलेला असतो. त्यामुळेच आज पनवेल परिसरातच नाही तर रायगड आणि  रत्नागिरी जिल्ह्यातून अपघात झाला  किवा सांध्याची शस्त्रक्रिया असेल तर पहिली पसंती लिखिते रुग्णालयालाच असते. हॉस्पिटलमध्ये राजस्थानी कलाकारांनी बनवलेल्या मार्बलच्या मीना काम केलेल्या सुंदर मंदिरात श्री गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीची गणेशोत्सवात दहा दिवस भक्तिभावाने पूजा केली जाते. डॉ. पुष्कर, त्यांची पत्नी डॉ. स्वाती आणि वडील सुधाकरराव, हॉस्पिटलचे कर्मचारी, सर्व जाती – धर्माचे रुग्णांचे  नातेवाईक आरतीला हजर असतात. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला जातो. एकदिवस डॉक्टरांतर्फे सर्वांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. हे दहा दिवस येथील रुग्ण आणि कर्मचार्‍यांना एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातात. त्यामुळे वर्षभर कामासाठी उत्साह राहतो, असे येथील कर्मचारी सांगतात.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply